सोमवार, १३ मे, २०१३

वाईट कर्म केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.

'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. या धर्म सूत्रामध्ये अज्ञानातून बाहेर पडून ज्ञानाकडे जाण्याच्या मार्गासोबातच दारिद्र्यापासून लांब आणि वैभवाच्या जवळ जाण्याचा मार्ग जोडला गेला आहे. संसारिक जीवनामध्ये सुख आणि समृद्धीसाठी पैसा महत्वाचा मानला गेला आहे.

धर्मग्रंथ महाभारतामध्ये लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहण्यासाठी कर्म आणि स्वभावाशी निगडीत चुकीची कामे न करण्याचे सांगण्यात आले आहे. वाईट कर्म केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.यामुळे घरामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो

महाभारतामध्ये लिहिले की -

षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता।
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता।।

या श्लोकामध्ये कर्म, स्वभाव आणि व्यवहाराशी संबंधित ६ गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे.
झोप - अधिक किवा गरजेपेक्षा झोप म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असून हे दरिद्र्तेचे कारण ठरू शकते. यामुळे झोप संयमित, नियमित आणि वेळेप्रमाणे असावी. वेळ आणि कर्माला महत्व देणारा व्यक्ती धन मिळवण्यास पात्र बनतो.


तंद्री - ही निष्क्रियतेची ओळख आहे. ही कर्म आणि यशामधील सर्वात मोठी बाधा आहे. कर्महीन मनुष्य लक्ष्मीच्या जवळ पोहचू शकत नाही

भीती- भयामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. याशिवाय यश शक्य नाही. निर्भय आणि पावन चरित्र लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे कारण आहे.

क्रोध - क्रोध मनुष्याच्या स्वभाव, गुण आणि चारित्र्यावर वाईट प्रभाव टाकतो. हा दोष सर्व पापांचे मूळ आहे.यामुळे लक्ष्मी क्रोधी मनुष्यापासून दूर राहते.

अनावश्यक विलंब  (उशीर) – लवकर आणि सहजरीत्या पूर्ण होणार्या कामाला
वेळ लावणे. यामुळे लक्ष्मी मिळण्याचा काळही लवकर येत नाही.

आळस - आळस ठरवलेले काम पूर्ण करण्यातील सर्वात मोठी बाधा आहे. संकल्प पूर्ण करण्यासाठी आळस दूरच ठेवा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा